About Us

 

We are one of India's best known brands and was founded with a simple objective - to help people find happiness. The company pioneered online matrimonial in 2013 and continues to lead the exciting matrimony category 

 

Saptapadi Vivah was started in the year 2013 by Dr Snehal & Avadhut. This idea of matrimonyweb site was conceptualised after seeing the problems of getting the right life partner and the steps involved in setting up criteria's for a partner and then shortlisting.

 

Saptapadi Vivah is a Matrimony web site dedicated to help you find your right Life partner for life. We understand todays problems of searching the right partner and hence provide you with this web portal to search the right partner with your convinience.

Saptapadi are the seven vows taken by the bride & groom during the marriage ceremony.

 

संस्थेची स्थापना: 

आजकल एकूणच लग्न जमण्यापासून ते होण्यापर्यंतच्या आणि त्याच्यानंतर ते पेलवून शेवटपर्यंत नेण्याच्या मार्गातले मानसिक, शारिरिक व वैचारिक अडथळे पहाता गरज आहे ती आजकलच्या  वधू-वर तथा त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याची आणि याच अडथळ्यांची शिदोरी पाठीशी बांधून सप्तपदी विवाह संस्थेची सुरुवात नोव्हेंबर 2013 मध्ये श्री अवधूत सुखटणकर व डा. सौ स्नेहल अवधूत सुखटणकर यांनी केली. आज गेली 6 वर्षे ही संस्था अनेक उपवर मुला-मुलींना त्यांचा योग्य जोडीदार मिळावा म्हणून कार्यरत आहे.

संस्थेचे उपक्रम:-

1. उपवर मुलामुलींची थेट भेट घेऊन त्यांच्या अपेक्षा तथा लग्नाबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेतले जातात. गरज पडल्यास त्यांना मार्गदर्शनही केले जाते.

2. उपवर मुला-मुलींबरोबरच त्यांच्या पालंकाचेही विचार जाणून घेऊन आवश्यक असल्यास मार्गदर्शन केले जाते.

3. वैयक्तिक लक्ष घालून लग्न जमण्याबाबत प्रयत्न केले जातात. (VIP Service)

4. गरिब तथा अल्पशिक्षित मुलींसाठी संस्थेमार्फत खास सुविधा उपलब्ध आहेत.

5. अपंग, व्यंग तथा निराधार स्थळांसाठिही खास प्रयत्न केले जातात.

6. विवाहपूर्व तथा विवाहानंतर  समुपदेशन.(Premarital, Post marital Counseling)

7. घटस्फोटीत / विधवा / विधूर स्थळांसाठीही विशेष प्रयत्न केले जातात.

8. वर्षातून अनेक वेळा मेळावे तथा उपवर मुल-मुली, त्यांचे पालक यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

 

संस्थेची विश्वासहर्ता:-

सुखी समाजासाठी सुखी कुटुंब आवश्यक असत, पण सुखी कुटुंबाचा पाया म्हणजे नवरा बायकोमधील निखळ नातं. मग अशा नात्याची सुरुवात करताना प्रामाणिक व योग्य ती परख होणे गरजेचे आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करुन ‘सप्तपदी विवाह’ संस्थेला एक परिपूर्ण विवाह संस्था बनवण्याचा ध्यास आम्ही घेतला. आज संस्थेबद्दलची पालकांत असणारी विश्वसहर्तता खरचं प्रशंसनीय आहे. आपण दाखवलेला विश्वास पहाता आम्हाला आमची जबाबदारी कित्येकपटीने वाढल्याची जाणीव होते. नवनव्या उपक्रमाद्वारे उपवर मुलामुलींना त्यांचा भावी जोडीदार शोधण्यासाठी आमची संस्था सतत कार्यशील राहिल.

 

सप्तपदी विवाहच का?

1) व्यक्तिगत लक्ष घालून आवश्यक मार्गदर्शन

2) लग्न जमण्याबाबत वैयाक्तिक लक्ष

3) अत्याधूनिक Website तथा Mobile App ची व्यवस्था

4) Premarital & Postmarital Counselling ची सोय.