Saptapadi Vivah was started in the year 2013 . This idea of matrimony web site was conceptualised after seeing the problems of getting the right life partner and the steps involved in setting up criteria's. Saptapadi Vivah is a Matrimony web site dedicated to help you find your right Life partner for life. We understand todays problems of searching the right partner and hence provide you with this web site & app to search at your convinience.

 

With hundreds of matching profiles, selecting the right profile is an important job. With our experienced & skilled staff, who have deep understanding of cultures, life styles and human emotions, we analyse profiles based on your expectations.

Understanding emotions, shortcomings & strengths of each profile gives us insights into who can be an ideal match. Through VIP Plan we council, Bride or groom, their parents and help them set their criteria and priorities in selecting the right partner.

 

Our VIP Plan helps you in short listing and contacting profiles, so that you save time and the grill of going through unnecessary profiles.

Misunderstanding occurring due to language differences, cultural differences perceived on the phone can be avoided through our guidance.

 

 

*********************************************************************************************************************************************************************************

 

"विवाह " हा आपल्या १६ संस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार . या संस्कारामार्फत दोन कुटुंबे एकत्र बांधली जातात आणि दोन जीवांच्या मिलनाने भावी समाजाची बांधणी होते . त्यामुळे सामाजिक दृष्ट्या या संस्काराला अनन्य साधारण महत्व आहे . पण वैयक्तिक पातळीवर वधू - वरांची एकमेकांबरोबर जुळवाजुळव मग ती भावनिक , मानसिक किंवा शारीरिक जुळवाजुळव असणे गरजेचे आहे . पुर्वीच्या काळी कुटुंबातील वडील धारे लग्न जमवण्याची प्रक्रिया आपापसात ठरवायचे आणि वधू - वर त्यांच्या पसंतीला संमती देत बोहल्यावर चढायचे ... आणि बांधल्या गेलेल्या नात्यात आयुष्याच्या अखेर पर्यंत एकमेकांना सांभाळून घ्यायचे .

             पण आजचा काळ बदललेला आहे . त्या प्रमाणे लग्नाचे समीकरणही बदललेले आहे पर्यायाने लग्न ठरवण्याची पूर्ण प्रक्रियाही बदललेली आहे . आताच्या पिढीला स्वतःचा मनपसंद  जोडीदार निवडण्याची मुभा आज बऱ्यापैकी पालकांनी दिली आहे . पण पूर्वी सारखं विवाहसंस्थेच्या चकरा मारणं  , तासंतास  फायली चाळण या पिढीला जमणं अशक्य प्राय आहे . अशा वेळी उपयोगी पडते ती टेकनॉलॉजि . (technology ). website  च्या माध्यमातून साजेशीर स्थळांची माहिती घरबसल्या मिळवणे खूप सोपे झाले आहे .आणि  आजची उपवर पिढी याचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसत आहे .

 

Website-

          सप्तपदी विवाहाच्या च्या www.saptapadivivah.com या वेबसाइट मार्फत आजतागायत २०,००० च्या वर उपवर तरुण तरुणीच्या नोंदण्या झाल्या असून  २००० अधिक विवाह या वेबसाईट मार्फत ठरलेले आहेत . कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा , गुजराथ, मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश , तेलंगणा तसेच परदेशातूनही हजारो  वधू - वरांनी सप्तपदीविवाहाला  उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि संस्थेच्या सुविधांप्रती समाधानकता दर्शविली आहे .

   

विवाह पूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन ( Premarital & Postmarital  counselling ) –

                 आज विवाह ठरण्या मध्ये जे काही चढ  उतार आहेत त्याहून अधिक अडचणी आज झालेले विवाह टिकवण्यात आहेत कारण वर - वधू दोघेही सुशिक्षित आणि स्वावलंबी असतात अशा वेळी एकमेकांप्रती आदर , प्रेम , खंबीर पाठिंबा आणि वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या  तडजोडी या सर्व मूल्यांची ओळख या पिढीला सुरवातीपासून करून देणे गरजेचे ठरत आहे . त्या दृष्टीने सप्तपदी विवाह मार्फत विवाह पूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन ( Premarital & Postmarital  counselling ) ची सुविधा पुरवली जाते .          

 

VIP Service-

         नोकरीतील जबाबदाऱ्या , कामाच्या वेळा , व्यस्त वेळापत्रकांना सांभाळत लग्नासाठी संशोधन करणे बऱ्याच तरुण तरुणींना जमत नाही , बऱ्याचवेळा पालकांची बोलण्याची शैली , आपल्या स्थळातील सकारात्मक गुणांना समोरच्या स्थळांपर्यंत पोहचण्यात असक्षमता या गोष्टी लग्न ठरण्यामधील अडथळे ठरू शकतात . आणि याच अडचणींना उत्तर म्हणून सप्तपदी विवाह मार्फत VIP सेवा सुरु करण्यात आली आहे . यामध्ये सप्तपदी विवाह मार्फत एक कार्यकारी ( Executive ) आपल्यासाठी नेमून देण्यात येतो जो आपल्याला साजेशीर स्थळांची शॉर्टलिस्टिंग करून देतो आणि आपण पसंद केलेल्या स्थळांकडे आपल्यावतीने बोलून आपल्या भेटी - गाठी नियोजित केल्या जातात . आजकल बरीचशी स्थळे न भेटता फोन वरच नाकारली जातात . त्यामुळे साजेशीर स्थळांना एकमेकांना भेटवणे हा आमच्या VIP सर्व्हिस मागचा मुख्य हेतू आहे . कारण "वधू - वर भेटले कि लग्न ठरतात" हा आमचा अनुभव आहे .

 

मेळावे, कार्यशाळा-

 वेळोवेळी मेळावे , पालकांसाठी , वधू - वरांसाठी खास कार्यशाळेचे आयोजनही केले जाते . जेणेकरून आमचा उद्देश  फक्त लग्न ठरवणे नसून लग्न अगदी शेवट पर्यंत पेलवून  नेण्याची ताकद  आमच्या वधू - वरांमध्ये जागृत करणे हा आहे . कारण समाजातील एक घटक म्हणून आपण समाजाचे ऋण लागतो आणि आपल्या या समाजाला सक्षम बनवायचं असेल तर आई - वडील प्रगल्भ असणे महत्वाचे . प्रगल्भ समाजाच्या बांधणीसाठी सप्तपदीविवाह मार्फत उचलेला हा खारीचा वाटा .