Boys!! Grooming yourself is important

मुलांनीही ग्रूमिंग वर ध्यान देणे गरजेचे


                     "लग्न पहावे करून " असं आपल्याकडे म्हणतात , कारण एक लग्न ठरणे , ते व्यवस्थितपणे पार पडणे आणि पुढे ते positively निभावून जाणे वाटते तितके आता तरी सोपे राहिले नाहीये. जेव्हा प्रश्न येतो वधू - वर संशोधनाचा आणि त्यातल्यात्यात एकमेकांना दिल्या जाणाऱ्या नकारांचा, सर्वात प्रथम ऐकायला मिळत ते , आज मुलींच्या अपेक्षा भयानक वाढल्या आहेत. आणि सगळं खापर या एका विषयावर मारून वधू - वर संशोधनाचा approach च दिवसेंदिवस negative होतं चाललेला आहे . मलाही अनेक वेळा दिसते कि बऱ्यापैकी मुलींच्या अपेक्षा ह्या totally imaginary आणि unrealistic असतात. पण लक्षात घ्या नाण्याला दोन बाजू ह्या असतातच. आता मुलाचं पॅकेज, जमीन जुमला या गोष्टीना थोडं बाजूला ठेवू . कदाचित ते जम्याच झाल्यावर वधू - वर एकमेकांना भेटतातही. पण भेटी नंतर अनेक मुली , त्या मुलांना reject करताना दिसतात. जेव्हा मुलाचं स्थळ तुमच्या अपेक्षेत तंतोतंत  पटत होतं म्हणूनच तुम्ही भेटलात मग हा नकार का? अनेक मुलींना जेव्हा हा प्रश्न आम्ही विचारला , तेव्हा त्यांच्या कडून जी उत्तर मिळाली ती अशी, "त्या मूलाला चार चौघात बोलायचा  कॉन्फिडन्स नव्हता, त्याच dressing सेन्स बरा नव्हता, तो खूप गबाळ्यासारखा दिसत होता, त्याच्या बोलण्यात खूपच रुडनेस होता ”. अशी अनेक कारणे आम्हाला कळाली. आणि यावरून लक्षात येतं कि आज बदलत्या काळाप्रमाणे आपण बदलणे , स्वतःला ग्रूम करणे, स्वतःला upgrade करणे, आपल्या व्यक्तिमत्वावर थोडं काम करणे अत्यंत महत्वाचे होतं चालेले आहे .
अनेकदा आम्ही पाहिलंय जेव्हा वधू - वरांची भेट आम्ही घडवून देतो, मुली एकदम टीपटाप तयार होऊन आलेल्या असतात, बोलायला व्यवस्थित असतात  पण मुलांचा  शर्ट साधा इस्त्री केलेलाही नसतो, दाढी व्यवस्थित नसते, काहींना व्यवस्थित आपले मुद्दे त्यांना मांडताही येत नाहीत तर काहींना आपला मोठेपणा पहिल्याच भेटीत वाढवून चढवून सांगण्यात खूप धन्यता वाटते पण ओव्हरऑल त्यांची  body language आणि personality कुठेतरी एक ३rd पार्टी म्हणून आम्हालाही खटकते मग मुलींना ते वाटणं साहजिकच आहे ना. 
            काही सुसंस्कृत उपवर तरुणही आहेत , ज्यांना हे कळत कि कांदापोहेचा कार्यक्रम म्हणजे एक फॉर्मल function असल्या सारखंच आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी वधू आणि  वरही एकमेकांना ह्या भेटीच्या आधारावरच judge करतात. दुसऱ्यांदा ह्या व्यक्तीला भेटायचं कि नाही हे नकळतपणे ह्याच भेटीत ठरवतात. आणि त्याप्रमाणे हे तरुण prepared असतात. आणि अर्थातच त्यांच्या वधू संशोधनामध्ये खूप काही अडचणी येतच नाहीत. त्यांची लग्ने लवकर जमतातच.

             एक महत्वाचा मुद्दा इकडे मांडावासा वाटतो.   आपण practically विचार केला तर दिसून येईल, आज ज्या पद्धतीने मुली स्वतःला ग्रूम करताहेत, मग ते शैक्षणिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल  सामाजिक दृष्ट्या असेल किंवा the way  they carry themselves आणि मुलं ज्या पद्धतीने स्वतःला carry करताहेत यात खूपच तफावत दिसून येतीये. आज आपण २१ व्या शतकात आहोत, आपल्या देशात इतकी शैक्षणिक क्रांती झाली आहे, आज almost सगळ्या मुली well qualified आहेत,  minimum   graduate तरी आहेतच आहेत पण दुर्दैवाने अजूनही अनेक उपवर  मुले १०वी, १२वी , undergarduate आहेत. पूर्वापारपासून आपण ऐकत आलोय शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. मग जेव्हा वधू - वरांच्या शिक्षणातचं जर तफावत असेल तर वैचारिक पातळीवर त्यांचे विचार पटणे  अतिशय अवघडच आहे.  मग त्यात मुलींच्या अपेक्षा वाढलेत म्हणण्यात काहीच अर्थ नाही. 
                   साधीशी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी किंवा आईवडील आपल्या मुलीसाठी वर संशोधन करतात तेव्हा साहजिकच ते educated, well qualified आणि well settled आणि नकळतपणे well groomed मुलगाच पाहतात. मग स्वतःच्या बाबतीतही मुलांनी यावर अत्यंत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. आपल्याला मिळणाऱ्या नाकारासाठी सतत दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा आपण कसे स्वतःला ग्रूम करू शकू, काळाप्रमाणे upgrade करू शकू यावर विचार व्हायला हवा. हवी असल्यालास समुदेशकाची , counselor ची मदत घ्यायला  हवी.
           कारण शेवटी लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्याकडे एक बोट दाखवतो , तेव्हा आपलीच 3 बोटे आपल्याला खुणावत असतात. ज्या मुलींच्या अपेक्षा आभाळाएवढ्या आहेत , त्यांना अर्थात त्याचे परिणाम, मनस्ताप हा होणारच आहे कधी ना कधी पण म्हणून सगळ्याच मुली माजलेल्या आहेत असं नाही. आज अशा अनेक मुली आहेत ज्या खूप प्रॅक्टिकल आहेत,  practically विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे बर्याचश्या उपवर तरुणांना आज self grooming वर थोडं काम करणे हि काळाची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

डॉ . स्नेहल सुखटणकर
विवाह समुपदेशक
सप्तपदी विवाह संस्था

  18th October, 2022

Leave a Comment