Char Divas Sasuche....!!!!

चार दिवस सासूचे ......... !!!

                आजकाल आपल्याकडे सासू -सुनांच्या राजकारणी मालिकांचा सुळसुळाट झालाय...आणि दुर्दैवानं अशा भडक कथानकांना TV चॅनेल्स वर जास्तीतजास्त  TRP मिळतोय . मग अशा मालिका बघून बघून आपण आपलं मत ठाम करतो ,'सासू हि सासूचं असते ती कधी आई बनूच शकत नाही ' किंवा 'सून हि सुनच असते  ती कधी मुलगी बनूच शकत नाही ' ......

               एक महत्वाचा मुद्दा ज्यामुळे हे सासू-सुनेचं नातं धोक्यात येण्याची शक्यता असते ते म्हणजे भीती . दुर्लक्षित होण्याची , आपल्या मुलापासून मानसिकरित्या दूर जाण्याची जी प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या लग्नानंतर वाटत असते . त्याची तीव्रता कमी -जास्त प्रमाणात असू शकते पण ती हृदयाच्या कोणत्यातरी कप्प्यात खोलवर असते खरी!!! कारण तीच लग्न झाल्यापासून नवऱ्यानंतर दुसरं विश्व म्हणजे तिचा मुलगा असतो पण जसं त्याच लग्न होतं नैसर्गिकरित्या तो आपल्या बायकोकडे आकर्षिला जातो पण यासगळ्यात घालमेल होते ती आईच्या मनाची . मुलाच्या लग्नानंतर नकळत घडणाऱ्या या बदलांना सहजपणे पचवणं तिला अवघड जात , साहजिकच याला ती सुनेला जबादार मानते , आणि इथूनच सुरवात होते महाभारतला ..

      अशावेळी सुनेनी काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी , तिने कधीही आपल्या कृतीतून ,बोलण्यातून  आई मुलामध्ये अंतर येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे . सुनेने आई-मुलाच्या या छोट्याशा जगाला धक्का न देता प्रेमाने ,आपुलकीने स्वतःलाही या जगाचा एक हिस्सा बनवून घेण्याचा प्रयत्न करावा .कारण आज तुम्ही सून आहात पण उद्या तुम्हीही आई आणि पर्यायाने सासू होणार आहात .त्यामुळे आजच जर आपण या संस्काराचे बीज आपल्यात पेरले तर उद्या येणारे अंकुरही संस्कारक्षम असेल आणि मग तुम्हाला सासू होण्याचा अभिमान वाटेल .

                                                    Dr Snehal Avadhut Sukhatankar  

  4th October, 2019

Leave a Comment