ek lagnachi dusari goshta

“एका लग्नाची दुसरी गोष्ट”
शिर्षक वाचुन एका मराठी सिनेमाची आठवण झाली ना?? पण इकडे प्रसंग थोेडासा वेगळा आहे. एक अनुभव सांगावासा वाटतो. माझीच एक क्लायेंट डॉक्टर झोलेली चांगली छान, हुशार, दिसायला चारचौघी प्रमाणे. पण गेली 5 वर्ष तिच्यासाठी वर संशोधन चालू होत. बरीचशी स्थळे स्वतःहून फोन करायची पण ह्यांच मात्र स्थळांना फोनवरच गाळून टाकण्याच काम चालू होत. आधी डॉक्टरचं हवा म्हणून, मग कधी मेट्रोसिटीतला नको म्हणून अनेक कारणे !!!
पण 5 वर्षानंतर त्यांच्या अटी थोड्याफार प्रमाणात शिथिल झाल्या, झाल! मग बाईसाहेब इंजिनियर मुलांना पहावयास तयार झाल्या, तरी अपेक्षा तशा होत्याच बर्यापकी. पण स्वतःहून एक इंजीनियर स्थळ चालून आलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक, चांगल पकेज, एकूलता एक. बरं थोडी फार अडजेस्टमेंट म्हणून त्याला भेटायचा कार्यक्रम ठरला. त्याप्रमाणे झालाही पण हे प्रकरण इकडेच संपेल तर मजा कसली ???
कांदापोह्याच्या कार्यक्रमानंतर मुलीच्या घराचे मंडळी बाहेर पडले खरे. पण त्यांच्या लक्षात आलं बाजूच्याच गल्लीत आपले ओळखीचे रहातात आणि त्यांचा अपघात होऊन हाताला इजा झालीये, मग एक 10 मिनिटे त्यांच्याकडे भेटून जाव असं ठरल ठरल्याप्रमाणे सगळे गेले ही पण तिकडे ज्या बाईंचा अपघात झाला होता त्यांचा मुलगा होता, तोही लग्नाचा होता. बेंगलोरला असायचा. तोही  आलेला होता, झालं चहा-पाण्याबरोबर सगळ्यांचा गप्पांचा कार्यक्रम झाला पण या मुलीला त्या इंजीनियर मुलापेक्षा सहज भेटायला म्हणून गेलेल्या बाईंचा मुलगा जास्त आवडला.
मुख्य म्हणजे त्याबाईंनी एका वर्षापुरवी स्थळाकारिता फोनही त्यांना केला होता, पण मुलीच्या अपेक्षेत आपल स्थळ बसत नाही हे सांगून भेटण टाळल गेले. पण एक वर्षानंतर त्याच स्थळाची अजाणतेपणे भेट होऊन सगळं कसं छान जमून आलं. बरं हे स्थळ तिच्या अपेक्षेमध्ये कुठेच बसत नव्हत, तरीही मुली कडून पसंती आली आणि लग्न झालं!!
अशी अनेक वास्तविक उदाहरणे मी पाहिली आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच की फोनवर स्थळं गाळून टाकण्यापेक्षा एकदा उपवर मुला-मुलींना, त्यांच्या कुटुबाला भेटणं गरजेचे आहे. कधी-कधी भेटल्यावर अपेक्षा शिथिल होऊ शकतात, विचार बदलू शकतात. भेटण म्हणजे काय लग्न ठरणं अस होत नाही त्यामुळे उपवर मुला-मुलींनो एकमेकांना फोनवरच नाकारत बसण्यापेक्षा आधी भेटा बोला, एकमेकांना समजून घ्या मगच निर्णय घ्या, आणि आम्हालाही गोड बातमी लवकर द्या!!!

डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर

 

  9th March, 2019