Family Or Career after Marriage


   संसार  ते  कॅरियर ...!!!!
                             'अरे संसार ,संसार ...जसा तवा चुलीवर ... आधी हाताला चटके मग मिळते भाकर ..!!' बहिणाबाईंच्या या बोधपर उक्ती अगदी लहानपानपासून प्रत्येक मुलीच्या मनावर बिंबवल्या जायच्या जेणेकरून चूल आणि मूल हेच तीच जग असायचं ... पण आपल्या समाजात काही अशा  कणखर ,मुसुद्दी ,ध्येयवादी स्त्रियाही होऊन गेल्या उदा : झाशीची राणी लक्ष्मी ,अहिल्याबाई होळकर ,Dr आनंदीबाई जोशी , पंडिता रमाबाई रानडे अशी कित्येक नाव निघतील ज्यांनी आपली संसाररूपी नवका तर यशस्वीरीत्या तारलीच पण त्याचबरोबर आपल्या अभूतपूर्व कार्यानी स्वतःचे अस्तित्वरूपी जहाजही तारून नेले .आणि आजतागायत ते आपल्या इतिहासात दिमाखाने टिकून आहे . 
                                                    आजच्या स्त्रियांना तर शिक्षण ,नोकरी ,राजकारण ,कायदा या सगळ्या क्षेत्रात स्वातंत्र्य आहे !! तरीही संसार आणि करिअर दोहोंचा समन्वय साधताना स्त्रियांना नाकी नऊ का येते ?? याची खरी कारणे आहेत मनाचा कमकुवतपणा , आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक मर्यादांचा अस्ताव्यस्तपणा !!!!
      स्त्रियांनी आपली ध्येये स्पष्ट करावीत . कुटुंबाप्रती आपली जबाबदारी , लक्ष कितपत हवे आणि आपल्या करियर विषयीची तळमळ , त्यासाठी द्यावा लागणार वेळ , करावे लागणारे प्रयंत्न ,सांसारिक त्याग ( कोणत्याही स्वरूपाचे )या दोन्ही गोष्टीमध्ये कुठेतरी स्त्रियांनी स्वतःसाठी मर्यादा घालून घ्याव्यात .कारण संसार आणि कॅरियरचा जो तराजू असतो तो जोपर्यंत समान उंची गाठतो तोपर्यंत आयुष्यात शांतता राहते पण ज्यावेळी दोघांपैकी एकजर डोईजड झाला तर दुसरी बाजू हवेतच राहणार हे नक्की...!!!!  

                                                                                                                                                                                        Dr Snehal Avadhut Sukhatankar

  3rd October, 2019

Leave a Comment