Generation Gap in Matrimonial Search

  आजकाल लग्नासाठी रितसर फोन केला जातो पालकांना पण ९५% केसीस मध्ये दोन्ही पालकांच्या संमतीने फक्त उपवर मुलं -मुलीचं भेटतात पहिल्यांदा . त्यांची पसंती आली तरच कुटुंबे आपापसात भेटतात !!!

   एक काळ होता जेव्हा मूल -मुली बाहेर एकमेकांबरोबर बोलणे किंवा मित्र -मैत्रिणींचा घोळका म्हणजे काही तरी जगावेगळे दृश्य असं लोकांना वाटायचं . लग्नासाठी तर कित्येकदा मुलगा -मुलगी प्रत्यक्ष भेटायचेहि नाहीत . पहिल्यांदा पालक भेटायचे , ठरवायचे आणि मग मुलगा -मुलगीची भेट थेट लग्न मंडपातच!!!

पण अशा संस्कारातून एक एक पिढ्या जश्या काळाच्या ओघात पुढे जात आहेत तसेच त्यांचे विचारही बदललेले दिसत आहेत . आजकालच्या पालकांनी आपल्या पसंतीच्या आधी त्या लग्न करणाऱ्या मुलगा -मुलगीच्या पसंतीला जास्त महत्व दिलं आहे .... एकूणच काय बदलत्या जगाबरोबर ही पिढी स्वतःलाही बदलण्याचा आणि त्या साच्यामध्ये स्वतःला ढाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे .  

पण हा प्रयत्न लग्न जमण्यापर्यंतच न राहता , लग्न टिकवण्याच्या दृष्टीनेही व्हायला हवा. एक विवाहित जोडपं म्हणून तुमचं त्या काळातलं वावरणं  आणि आताच्या पिढीतल्या मुलामुलींचं वावरणं यात नक्कीच फरक आहे , त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवणं , फिरणं ,मजा करण नक्कीच priority असू शकते . त्याचा उगाच बाऊ व्हायला नको याची काळजी घरातील मोठ्यांची आहे . कारण या ultra fast युगात वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नवरा - बायकोच एकमेकांसाठी वेळ काढणं आणि तो वेळ छान जगणं खूप गरजेचं आहे…

                                     Dr Snehal Avadhut Sukhatankar 

  3rd October, 2019

Leave a Comment