Hirva chuda..

" हिरवा चुडा "

                              आपल्या हिंदू संस्कृतीत अगदी पूर्वापारपासून सर्रास स्त्रिया - मुली हिरव्या बांगड्या हातात  घालताना दिसतात .. मुख्यतः लग्नाच्या वेळी नववधू तथा सर्व सुहासिनी स्त्रिया हिरवा चुडा भरताना दिसतात .. हा हिरवा रंग नवीन उत्पत्ती, सर्जनशीलता  आणि पोषकतेचे द्योतक आहे . त्याचप्रमाणे ह्या हिरव्या चुड्याला आध्यात्मिक महत्व हि आहे.   मुळातच हिरवा रंग सात्विकतेचे प्रतीक असल्याने त्यात कणाकणाने  प्रत्येक वेळी क्रिया शक्तीद्वारा नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद  असते . झाडांची हिरवी पाने हि जणू चैतन्य शक्तीची खाणच असतात .

                           जेव्हा नववधू हिरवा चुडा घालते तेव्हा तिच्या मनगटाभोवती एक पोकळी तयार होते ज्यामध्ये सात्विक दैवी स्पंदने निर्माण होतात , त्यामुळे वातावरणातील अशुद्ध स्पंदने नष्ट होऊन त्या नववधूभोवती एक प्रकारचे संरक्षक कवच तयार होते . हळूहळू हि स्पंदने मनगटातून - हातात व नंतर संपूर्ण शरीरात पसरतात , त्यामुळे नववधूमध्ये सकारात्मक चैतन्य निर्माण होण्यास मदत होते ..

                                                                      Dr Snehal Avadhut Sukhatankar /  8951852008

  18th October, 2019