Loot ki Pre-Marital Investment ???

लूट कि Pre-Marital Investment ???

आज सकाळी सकाळीच एक बाई घाई घाईत सप्तपदी विवाहच्या ऑफिस मध्ये आल्या, काय तर म्हणे मुलगा लग्नाचा आहे. चांगला देखणा उंचपुरा, चांगली नोकरी, पुण्यात स्वतःच घर सगळ कसं एकदम सेट. आता फक्त एक चांगली मुलगी हवी जी त्याला आणि आमच्या घराण्याला साजेशीर असेल, आम्ही आपल त्यांच सगळ एेकून घेतल स्थळ खरच चांगल असल्याने बरीचशी साजेशीर स्थळेही होती आमच्याकडे पण जेव्हा आमच्या कज्प्घ्ज्य्ल्ण्त्भ् ठन्ग्फ् बद्दल सांगण्यास सुरुवात केली, ती बाई एकदम भडकलीच !!!

काय तर म्हणे, विवाहसंस्थानी बाजारच मांडलाय, पैसे उकळण्याचे साधनच झाले आहे! या विवाहसंस्था आमच्या पैशांवर आपली घर चालवतात ! फसवणूक करण्यात यांचा हातखंडा असतो! हे तर पुण्याच काम आहे, थोड समाजकार्य केले तर बिघडल कुठे? मी एक पैसा भरणार नाही आधी स्थळ द्या लग्न होऊ दे मगच आपली फी भरेन !!!........ हुश्श शेवटी केंव्हाच्या दोषारोपनानंतर त्या बाईने अखेर केव्हाचा रोखुन ठेवलेला श्वास सोडला.

मी एक मोठा श्वास घेतला, समोरच्या चहाचा एक घूटूक सुकलेल्या गळ्याखाली घातला, आणि बोलायला सुरुवात केली. आजकलच्या महागाईच्या जमान्यात जिथे चांगला 4 आकडी पगारही महिन्याभरात कसाबसा पुरतो तिथे ही शिकलेली सुशिक्षित माणस फ्री सेवा, समाजकार्य यासारख्या गोष्टी करतात. खरचं हे योग्य आहे का???

आज समाजात सगळ्या कामासाठी मोबदला भरावा लागतो, अगदी झाडूपोछावाली पासून ते डाक्टर्स, वकिल, सि.ए. पर्यंत.

‘रुग्ण सेवा हिच ईश सेवा’ म्हणणारे डाक्टर्स तरी फ्री मध्ये तुमची ट्रिटमेंट करतात का? तपासणी फी भरावी लागतेच ना? बरं फी भरली तरी रुग्ण पूर्णपणे बरा होईल याची 100% खात्री देतात का?

आज वकिल लोक त्यांच्या फीज भरल्याशिवाय तुमची केस हातात घेतात का? बरं ही घेतल्यावरही कोर्टातली केस आपण जिंकालच याची हमी देतात का?

सि.ए. लोक त्यांचे चार्जेस घेतल्याशिवाय तुमचे अकाँट पहातात का??

‘विद्यार्जना सारखे दुसरे दान नाही’ म्हणणारे शिक्षक लोक आज मोफत मध्ये शिकवतात का?

नाही ना??!!!

मग विवाहसंस्थानीच समाजकार्य करायच, त्यांनी मोफतच सेवा दिली पाहिजे, आणि जेव्हा फिजची मागणी केली जाते तेव्हा त्यांचा पैसे कमवण्याचा खेळ चालू आहे अशी भावना का??

आपल्या मुलाच / मुलीच लग्न जमण्यासाठी आपल्याला दिशा दाखवली जाते, आपल्या मुलाचा / मुलीच्या आयुष्याचा मोठा अविभाज्य भाग कोण बनू शकतो याबद्दल आपल्याला मदत करणार्या विवाह संस्थाना इतका खालचा दर्जा का??

हे पण एक क्षेत्र आहे या क्षेत्रातही काम असतच, आपल्या स्थळालायक साजेशीर स्थळ शोधण, त्यांच्याशी फोन वर सगळ जुळवाजुळव करण. मग दोन्हीकडील कुटुंबाची सांगड घालून देण.........

यात काहीच कष्ट नसतात ?? काहीच खर्च नसतो?? काहीच वेळ द्यावा लागत नाही?? इतकेच नव्हे तर घरातील प्रत्येक माणूस वेगळा असतो तर मग दोन वेगळ्या संस्कारांच्या कुटुंबांची सांगाड घालून देण ही तारेवरची कसरत असते. दोन्ही बाजूंच्या नकारात्मक विचारांचा डोंगर डोक्यावर पेलवत सतत पुढे चालत रहाण्ां सोप नसत !!!

त्यामुळे कोणत्याही विवाहसंस्थेच्या नावाने ओरडण्याआधी वरील गोष्टींचा विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे!!!

आज काळ बदललाय, विचार बदलेले आहेत, शिक्षण वाढली, पगार वाढला, तस लग्नाच तयारी वाढत चालल आहे. त्यामुळे फक्त प्रयत्नच नव्हे तर सातत्याने प्रयत्न करण गरजेचे आहे आणि तो प्रयत्न एकाच विवाहसंस्थेपुरता न ठेवता अनेक विवाहसंस्थेकरवी करावा. कारण योग कुठून जुळून येईल सांगता येणार नाही. एखादी विवाहसंस्था आपल्याला 100 स्थळ देईल, पण त्यातून  एकही स्थळ जुळणार नाही दुसर्या एखाद्या विवाहसंस्थेकडून 1च स्थळ मिळेल पण त्याच स्थळाबरोबर लग्न जुळेल. त्यामुळे प्रयत्न हे सगळ्या बाजुनी हवेत, तेही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊनच !!!

डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर

  13th February, 2019

Leave a Comment