Ideal Marriage Age

लग्नाचं वय !!!!

काही कामनिमित्त बेंगलोरला जावे लागले तेव्हा तिथल्या एका special child केंद्राला भेट दिली त्यामध्ये बîयाचशा Autistic मुलांचा समावेश होता. काळजाला हूरहूर लागल्यासारखी झाली. एेवढी सुरेख सुंदर गोंडस निरागस मुले. मुले कसली !! निसर्गाची अप्रतिम किमयाच पण या मुलांच्या अशा वाढीला का फक्त निसर्गच कारणीभूत आहे का ? 

बरं जेव्हा त्या मुलांच्या आई-वडिलांबद्दल चौकशी केली तेव्हा उत्तर एेकून तर पोटात खड्डाच पडला ही सगळी मुले होती ती चांगल्या परिवारातील आई-वडिल MNC मध्ये नोकरी करणारे, चांगल्या द्दुद्दयावर . 5 महिन्याच तान्हं बाळही तिथ होतं त्या बाळाची आई त्याला सकाळी 8 ला सोडायची center ला, रात्री 8 ला न्यायला यायची.

आजची पिढी आर्थिक कचाटा म्हणून ज्या दिशेने वहात जातीये त्याला जर वेळीच लगाम बसला नाही तर होणारे पुरोगामी परिणाम खुपच भयानक असणार आहेत. 

मुली शिकल्या - चांगली गोष्ट आहे !

आर्थिक दृष्ट्या सबळ स्वावलंबी झाल्या-चांगली गोष्ट आहे ! मुलींना लग्नांसाठी आपल्या तोलामोलाच स्थळ हवयं मान्य आहे, अपेक्षा वाढल्या आणि त्या वाढतच आहेत...........

पण यामुळे होतय काय ? तर मुलींच लग्नाच वय वाढत चाललय. साधारणत : आधीच्या काळी 18-23 या काळात मुलींची लग्न होऊन 30 पर्यंत 1-2 मुले व्हायची पण आता चित्र बदलेल आहे.

मुलींची शिक्षण संपायला 24 मग दोन वर्षे Job करणार म्हणून 26 मग करियर मध्ये growth म्हणुन 28 मग पगार वाढलेला अपेक्षा वाढलेल्या मग त्याप्रमाणे शोधेपर्यंत 30-32 वर्षे उलटून जातात मग या वयात लग्न झालं की इतक्या लवकर chance कशाला या fancy विचाराखातीर आणि 2-3 वर्षे मोजमजेत जातात . म्हणजे 35 शी गाठते मग निसर्ग आपले रंग दाखवायला चालू करतो conceive होण्यासाठी अडथळे येऊ लागतात मग कधी infertility specialist डाक्टरच्या चक्करा, कधी ज्योतीषी बुवा तर कधी नवस-उपवास चालू होतात याने शारिरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक ताण निर्माण होतो. 

आपला मानवी स्वभाव कसा आहे पहा . आपल्याला जे अगदी सहजपणे मिळत त्याची कधीच किंमत नसते पण जी गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी कठीण असते तीच गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटू लागते मुलाबद्दलची तळमळ स्त्रीला इतकी अस्वस्थ करते की त्यातून कौटूंबिक वादविवाद, दोषारोपण चालू होतात कितीतरी स्त्रीया depression मध्ये जातात पण याचा त्रास का फक्त त्या दांपत्यालाच होतो-नाही ! दोन्ही घराण्यातील वडिलधाîयांनाही याचे परिणाम भोगावे लागतात. 

40 शी गाठलेली स्त्री मातृत्वासाठी भावनिक दृष्ट्या सक्षम असली तरी शारिरिक साथ बहुतांशी कमी पडते. आज आपण medical articles काढून पहिली तर जास्तीत जास्त autistic मुले जन्माला येण्याचं मुख्य कारण म्हणजे आईचं pregnancy च्या वेळेचं पोक्त वय.

नवीन जीवाची उप्रत्ती आपल्या गर्भातून एका पेशी पासून चालू होते ते एक अखंड मानवी शरीर त्या गर्भाशयात क्रमाक्रमाने आकाराला येत असत त्याच्या सगळ्या अन्नादी गरजा मातेच्या शरीरातून त्याला मिळत असतात पण 40 शी नंतर म्हणजे 40-48 च्या दरम्यान स्त्रीचा रजोनिवृत्तीचा (menopause) काळ असतो. ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात Harmonal imbalance असतो अशावेळी जर pregnancy राहिली तर जन्माला येणाîया बाळात काही शारिरीक, मानसिक कमतरता असू शकतात. उदा : Cerebral Palsy, Autism , Down's Syndrome, Hyperactivity Syndrome.

या लेखातून कोणालाही घाबरवण्याचा किंवा दिशाभुल करण्याचा हेतू नाही पण जर आपण, आपला समाज या गोष्टीवर आताच उघडपणे नाही बोललो तर जन्माला येणाîया पुढच्या पिढीचे भवितव्य आपण धोक्यात घालत आहोत.

त्यामुळे मुलींनो निसर्गाने आपल्याला स्त्रीचा जन्म हा काही विशिष्ठ उद्दिष्ट्यपूर्ती साठी दिलेला आहे याच जरा भान असू द्याव. पैसा, द्दुद्दा, करियर करण्यासाठी पुर्ण आयुष्य आहे. पण सुदृढ सशक्त संस्कारक्षम भावी पिढी जन्माला घालण्याचा काळ हा मर्यादितच आहे. 

डा. स्नेहल अवधुत सुखटणकर

  16th July, 2019