No Marketing Please..!!!!

उगाचचं मार्केटिंग कशाला ??

                       मार्केटिंग क्षेत्र तसं आपल्या ओळखीच नै का ?  विविध गोष्टींचं मार्केटिंग जन सामान्यात करायचे आणि त्याचा खप करायचा हे या क्षेत्रात घडत . पण पूर्वीच्या काळी बोलल जायचं कि मार्केटिंग करणं साध्यासुध्या माणसाचं काम नाही बरं का ?? मग त्या विषयाची खोली जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असं वेगळं मार्केटिंग क्षेत्रच निर्माण झालं . त्यात लाखो रुपये खर्च करून मुलंमुली आजकाल Bachlor / master डिग्री मिळवतात . तरी बऱ्याचदा या डिग्री होल्डर लोकांना जे जमत नाही ते साधे , अशिक्षित लोकही अगदी सहजपणे आणि लोकांनां भुरळ पडेल अशा भाषेत करू शकतात , कोणत्याही गोष्टीच मार्केटिंग !!!!!!

                       आता आपला लग्नाचा विषय चाललाय तर लग्नाच मार्केटिंगचं घ्याना .....अगदी मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसर्सनाही जमणार नाही त्या तोडीचं मार्केटिंग केल जात लग्नाळू वधूवरांच्या आईवडिलांकडून आपल्या स्थळाबाबत . काहीवेळा अशा मार्केटिंगची इतकी अतिशोयोक्ती केली जाते कि मग समोरच्या लोकांना वास्तवदर्शनी जे काही दिसत यात जमीन आसमानांचा फरक असतो .

                          साहजिकच प्रत्येक आईवडिलांना वाटत असत कि आपलं स्थळ अनुरूप आहे आणि आपल्या पाल्याला super अनुरूप स्थळ मिळावं ... काहीच वावगं नाहीये त्यात ..... !!पण ते समोरच्या स्थळाला पटवून देण्यासाठी अवाजवी कौतुकानं आपला मुलगा - मुलगी काहीतरी विशेष आहे हे सांगणं  कालबाह्य झालाय आता ...          

                                बऱ्याचवेळा लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांकडूनही अस माकेर्टिंग केलं जात , त्यात मुख्यतः रंग ,रूप  , उंची  , शिक्षण , उत्पन्न यांचा समावेश असतो . आजकालच्या digitalsation च्या जमान्यात फोटोमध्येही अनेक बदल घडवून आणले जातात .पण मग जेव्हा भेटीचा कार्यक्रम ठरतो आणि समोरच्या लोकांना खरं काय- खोटं काय दिसत तेव्हा मात्र जे घडायचं असत तेच घडत ...पण हे सर्व घडत असताना वधू - वराना ज्या मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते याचा कुणी विचारच करत नाही .....

                      वधू - वराना  त्यांच मार्केटिंग नकोय !! नको आहे ती भपकेबाजी !!!  ते आहेत तसं  स्वीकारणारा जोडीदार हवाय त्यांना !! एकमेकांच्या पंखांना बळ देऊन एकमेकांबरोबर उंच भरारी मारू इच्छिणाऱ्या ह्या पिढीला त्यांचा भावी जोडीदार शोधू देण्याची थोडी space हवी . त्यामुळे लग्नाच्या दृष्टीने माहितीचा फॉर्म भरणे असो किंवा मेळावे , कार्यशाळा असोत , यात मुख्यतः सहभाग असावा तो वधूवरांचाच !!!

                                                                                                                                                        Dr Snehal Avadhut Sukhatankar

  16th October, 2019