Pitrupaksha/Mahalaya Amavsya

      पितृपक्ष /महालय अमावस्या

                    आपल्याकडे पितृपक्षाचा कालावधी सर्वात अशुभ मानला जातो. साधारणतः हा काळ गणेश चतुर्थी नंतर ते घटस्थापने पर्यंतचा मानला जातो. हा काळ शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो. पण खगोलीय काळ हा जवळजवळ २ महिन्याचा आहे. कारण महालयाची खरी समाप्ती सर्वपित्री अमावास्येला होत नसून जेव्हा सूर्य तुला राशीतून वृश्चिक राशीत संक्रमण करतो तेव्हाच होते.

                                  पितृपक्षाबद्दल बर्याचशा गैरसमजुती आपल्या समाजात प्रचलित आहेत. या काळात बऱ्याचशा आत्म्यांचा वावर पुर्थ्वीतलावावर असतो असा मानलं जात त्यामुळे बऱ्याचशा  नकारात्मक शक्तीचा मज्जाव असतो त्यामुळे कोणतेही शुभ कार्य मग ते लग्न असो किंवा मुंज असो, उद्योगधंद्याची सुरवात असो ,किंवा आणखी काही शुभ कार्य करण टाळलं जात . लग्न करण  तर सोडा लग्नासाठी पत्रिकांची देवाण-घेवाण हि केली जात नाही .

                                        पण मला सांगा जेव्हा केव्हा आपण मंगलकार्यासाठी पुजा करतो तेव्हा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी नांदीश्राद्ध हे करतोच ना? त्या मागे त्यांचे आशीर्वाद मिळून त्यांची कृपा संपादन करण्याचाच हेतू असतो . तेव्हा मंगल कार्यात त्यांची उपस्तीथी आपल्याला खूप सकारात्मक वाटते.  मग या पितृपक्षाच्या काळात जेव्हा ते स्वतःहून आलेले असतात असा आपण मानतो , तेव्हा त्यांच्या उपस्थितीला नकारात्मक शक्ती म्हणून का  संबोधिले  जाते?                              

                                  राहिला प्रश्न विवाह मुहुर्थचा .... पितृपक्षाचा काळ हा चातुर्मासात येतो आणि शास्त्रानुसार चातुर्मासात विवाह मुहूर्त असतंच नाहीत. मग पितृपक्षात मुहूर्त येणार कोठून? आणि पितृपक्ष धार्मिक वा नित्य व्यावहारिक कार्यासाठी वर्ज्य आहे असे कोणत्याही शास्त्रात लिहिलेले नाही.

                                     असो , ह्या लेखामागचा हेतू इतकाच आहे कि ऐकूनच लग्न ठरण्याच्या मार्गातले अडथळे वाढवत बसण्यापेक्षा या काळाचे शास्त्रीय कारण समजून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल कि पितृपक्षाचा कालावधी अशुभ नसून इतर पक्षाप्रमाणेच शुभ पक्ष आहे. आणि कार्यसिद्धीसाठी तर आपले पितरांचे आशीर्वाद  आपल्या बरोबर आहेतच यात शंकाच नाही.                                                                               

 

                                                                         Dr Snehal Avadhut Sukhatankar

                                                              

              

  20th September, 2019