Saptapadi Vivah diaries - rukmini swayamvar

रुक्मिणी स्वयंवर

      आपल्याकडे सर्रास उपवर तरुणींना लग्न लवकर जमावे आणि सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून "रुक्मिणी स्वयंवर " ग्रंथाचे पारायण सांगितले जाते . आजकाल बऱ्याचशा ऑडिओ क्लिप्स आहेत पण फक्त पारायणापेक्षा या ग्रंथाची माहिती , महती आणि त्याची फलद्रूपता जाणून घेऊन संकल्पपूर्वक पारायण केल्यास फळ हे मिळतच .

          भागवत हा आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया आहे . अशी एक पौराणिक कथा प्रचलित आहे , कि हा भागवत वैकुंठलोकी होता , नारदमुनींनी तो व्यासांकडे आणून दिला आणि मग व्यासांनी भागवताची रचना केली . भागवतात श्रीकृष्ण लीला सांगितल्या आहेत . त्यातील दशस्कंदातील कथा म्हणजे "रुक्मिणी स्वयंवर ".

          मराठीत तसे ३०-३२ रुक्मिणी स्वयंवर आहेत पण संत एकनाथ महाराजांनी काशी येथील मणिकर्णिका घाटावर ४५० वर्षांपूर्वी लिहिलेली हि कथा म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्म्यानी आपल्या भक्ताला दिलेली आज्ञाच होती .

               विदर्भात जन्माला आलेल्या रुक्मिणीने नारदमुनींकडून श्रीकृष्ण लीला ऐकल्या आणि ती इतकी भाळली कि श्रीकृष्ण आपला पती बनवा म्हणून प्रार्थना केली दुष्कृत्याकडे वळलेल्या रुक्मिणीच्या भावाने तिचे लग्न शिशुपालशी ठरवले होते . पण रुक्मिणीची आर्त हाक ऐकून श्रीकृष्ण बलरामसमवेत आले आणि त्यांनी रुक्मिणीच्या भावाशी आणि शिशुपालशी युद्ध करून रुक्मिणीला वरले .

  अशी हि साक्षात लक्ष्मी - नारायणाच्या द्वापारयुगातील मिलनाची कथा .

या ग्रंथातून रुक्मिणीचा कृष्णाप्रती असणारे प्रेम , भक्ती , समर्पण हे भाव प्रगट होताना दिसतात . एका सुखी संसाराला याच तर गुणांची गरज असते .जेव्हा आपण या ग्रंथाचे वाचन करत असतो तेव्हा नकळत हे सगळे भाव आपल्यात उतरत असतात . त्यामुळे रुक्मिणी स्वयंवर हे एक अक्षर सत्य ग्रंथ आहे . त्याचे श्रद्धेने आणि संकल्पपूर्वक वाचन , मनन , पठण केल्यास साक्षात विष्णू म्हणजेच श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्याला सर्वगुण संपन्न जोडीदार तर लाभणारच पण पुढील वैवाहिक आयुष्यही सुखमय आणि शुभमय होणार यात शंकाच नाही .

  25th May, 2020

Saptapadi Vivah

Hello Payal, you can read Rukmini Swayamvar every day at your convenience but with devotion. wish you all the best.

19th June 2021 02:21:44am

Payal naikwade

How to doing this

7th June 2021 01:57:03am

Leave a Comment