sasu sasare hota na

“सासू सासरे होताना 


आज सकाळी सकाळीच रानडे काकू ऑफीस मध्ये आल्या. चेहîयावर गोड हास्य आणि हातात पेठ्यांचा बाक्स. मी लगेचच ओळखलं म्हटलं, विक्रांतच लग्न ठरलं वाटतं !!! त्यांनी हसत हसतच होकार दिला मात्र तरीही त्या थोड्या गोंधळलेल्या जाणवत होत्या मी कारण विचारल असता म्हणाल्या पहिल्यांदाच सासू होतिये ना ! मग सुन म्हणून मी जे दिवस पाहिले त्याची पुनरावृत्ती माझ्या सुनेच्या बाबतीत नको व्हायला. म्हणून एका आदर्श सासूची भूमिका जाणून घेण्यासाठी आज मी खास आपल्याकडे आलीये .
साध्या 10 वी पास रानडे काकूंचं हे बोलणं मला खरचं आमच्या संस्थेच्या पाटीवर कोरून ठेवावसं वाटलं विचारांची इतकी प्रगल्भता नवीन जमण्याचा इतका सखोल अभ्यास क्वचितच मी होणाîया सासू-सासîयांच्यात पाहिलाय . 
लग्न जमल की 99% सगळे लग्नाची खरेदी, दागिने, जत्रा-हाल बुकींग, जेवण, आमत्रंण, केळ्वणं, फोटोशूट यात व्यस्त होतात. आणि especially वधू-वरांच्या आईवडीलांची तर धांदलच उडते इतकी सारी कामे त्यांच्यावरच येऊन पडतात कारण बîयाचदा लग्न ठरलेल्या मुला-मुलींना रजेचा अभाव कारण त्यांना सगळी रजा Honeymoon साठी वापरायची असते.
मग आईवडिलांची तारेवरची कसरत सुरू होते पण लग्नासाठी करत असलेल्या आर्थिक, सामजिक, कौटुंबिक तयारी बरोबरच घरात नव्याने प्रवेश करणाîया नव्या व्यक्तिबरोबर घरात होणाîया किंबहूना कराव्या लागणाîया बदलांची मानसिक तयारिही करायला हवी.
लग्नासाठी मुलाला हवी असते खुप शिकलेली चांगल्या हुद्द्यावर आणि चांगल्या पगारावर असलेली मुलगी मग आईवडिलही अशाच मुलीच्या शोधात निघतात पण जेव्हा अशा एकाद्या मुलीशी लग्न होतं जी तंतोतंत आपल्या अपेक्षेत बसते मग कशासाठी उडतात हे घरगुती खटके ??? का होतात सासू-सुनेमध्ये वाद-विवाद ???
याला कारण आहे मुलाच्या लग्नाच्या दृष्टीने असलेली अपुरी मानसिक तयारी. ही तयारी कुठलीही असू शकते अगदी स्वयंपाक घरातल्या वस्तुंच्या आदला-बदली पासून ते मुलग्या बरोबरचा वेळ घरातील रहाणीमानापासून ते महिन्याच्या खर्चांच्या बिलापर्यंत !!!
बक्कळ पगाराची सुन घरात येते तेव्हा ति तिच्या ऑफीस मधल्या जबाबदाîयांचा डोंगरही घेऊन येणार याची गाठ मनाशी बांधायला हवी कदाचित तुम्ही करत असलेला प्रत्येक पारंपारिक रिवाज करणं तिला जमणार नाही. मागच्या माहिन्यातच कोटणीस काकू आपल्या सूनेची तक्रार सांगत होत्या काय म्हणे हिला घरचे रितीरिवाज करायलाच नको श्रावणात सत्यनारायण पुजा घालण्याची रित माझ्या आजीसासूपासूनची त्याप्रमाणे माझ्या सासूनेही केलं आणि मीही करते पण जेव्हा हिला सांगितलं रजा घे पुजेच्या दिवशी तिने तोंड वाकड केलं असं कसं एकदम रजा मिळणार आणि मागच्याच महिन्यात चांगली 8 दिवस रजा टाकून नवरा बायको दोघे दार्जिलिंगला जावून आले काय तर म्हणे ‘quality time spending..’ झालं यातून घरात वाद !! 
अरे ही आजची पिढी आहे, स्वतंत्र विचाराची आहे. त्यांच्या priorities खुप clear आहेत एकदा-दोनदा घरातील रितीरिवाज किंवा काही उपदेश करणे ठिक पण पुन : पुन्हा हस्तक्षेप केल्यास वादच होणार !!!
त्याउलट हेमंतचे बाबा त्यांना घरात टि.व्हि बघताना पेपर वाचताना स्मोकिंगची सवय पण हेमंतच लग्न ठरलं रे ठरलं त्यांनी पाठी अंगणात जावून स्मोेकिंग करण्याची सवय स्वत:ला लावली ते म्हणाले, बायकोला मुलाला चाललं म्हणून सुनेला चालेलच असं नाही ना ? म्हणून आपणच सवय बदलेली बरी !!!
किती छान आहे हे !! ना ? 
खरचं अशा वैचारिक श्रीमंतीचा अभिमान वाटतो मला. एखाद्या मुलीला घरी सुन म्हणून आणणं आणि तिला मुलीसारखीच आहे असं म्हणणं सोप आहे पण त्या मुलीसारखीच असणाîया सुनेला खîयाखुîया मुलीचा दर्जा देणं यालाच खरा वडिलधारीपणा म्हणतात अस मला वाटतं .


डा. स्नेहल अवधुत सुखटणकर

 

  16th July, 2019