Shiv Parvati Aradhana - To solve marriage problems

 आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवी - देवतांना खुप मोलाचे स्थान आहे . आपल्या त्रिदेवांपैकी  महादेव  म्हणजेच शिवा याला ‘योगी’ किंवा ‘आदियोगी’ असेही म्हणतात. आणि देवी पार्वती म्हणजेच ‘शिवाची शक्ती’ . अशा या शिव - शक्तीच्या मिलनाची म्हणजेच त्यांच्या विवाहाबद्दल आपण आज जाणून घेऊया . 
        देवी सती जी राजा दक्षची कन्या होती तिने आपल्या तपोबलाने महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि विवाहाचा प्रस्ताव मांडला. महादेवांनी तो स्वीकारला. आणि त्याचे लग्न झाले . पण या लग्नासाठी  देवी सतीचे वडील राजा दक्ष कधीच तयार नव्हते , असा वैरागी, जटाधारी ,  महादेव त्यांना जावई म्हणून कधीच पसंत नव्हता . पण केवळ मुलीच्या हट्टापोटी त्यांनी हा विवाह करून दिला . पण सतत ते देवी सती आणि महादेवांचा अपमान करीत असत . एकदा भर सभेत आपल्या वडिलांनी आपला आणि आपल्या नवऱ्याचा केलेला अपमान सहन न होऊन देवी सतीने संतापून अग्नी प्रवेश केला . 
            जेव्हा हे महादेवाला कळाले, पत्नी वियोगाने संतप्त झालेल्या महादेवाने स्वतःला ध्यानमग्न करून टाकले . खूप मोठा काळ देव deep meditation मध्ये होते . दुसरीकडे देवी सतीनेच हिमालय नरेश हिमवान आणि त्यांची पत्नी मैनावती याच्या पोटी जन्म घेतला . जन्मताच सुंदर, तेजस्वी ,  अशा बालिकेकडे पाहून देवर्षी नारद मुनी म्हणाले , हि खूप मोठी शक्ती आहे आणि हिचे मिलन शिवाशी खूप आधीच ठरवून ठेवलेले आहे .. त्याप्रमाणे देवी पार्वतीनेही महादेवांना प्राप्त करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली . त्या दरम्यान महादेवांच्या आदेशाने सप्तऋषींनी पार्वतीला या उपासनेतून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण देवी पार्वतीने आपली साधना न विचलित होता चालूच ठेवली . तिच्या घोर तपोबलाने तिने साक्षात महादेवांना प्रसन्न करून घेतले आणि आपल्याला पत्नी म्हणून स्वीकारावे म्हणून वर मागितला . महादेवांनी तो दिलाही .
उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात शिव - पार्वतीचा विवाह पार पडला . 

             विवाहाच्या दिवशी जेव्हा महादेव आपल्या देव ,गण , गंधर्व , पिशाच्च सगळ्यांना घेऊन लग्न मंडपी पोहोचले . जावयाच्या स्वागतासाठी मैनावती पुढे सरसावली पण महादेवाचे ते रूप पाहून चक्क चक्कर येऊन जमिनीवर कोसळली . महादेव नंदीवर बसून एका हातात त्रिशूल , एका हातात डमरू , गळ्यात सापाचा हार आणि डोक्यावर जटा , शरीरावर रक्ताळलेले हत्तीचे चामडे आणि वर पक्ष म्हणून देवतांच्या बरोबरच पिशाच्चनां घेऊन आले होते . त्याचे हे उग्र आणि भयंकर रूप पाहून घाबरलेल्या मैनावतीने या लग्नासाठी साफ नकार दिला . पण देवी पार्वतीने महादेवांना निदान लग्नापुरते तरी आपले भयंकर रूप सोडून सामान्य रूपात येण्याची विनंती केली . महादेवांनी ते मान्य केले त्याप्रमाणे  ९ फूट उंचीच्या सुंदर , बलदंड महादेवांना पाहून देवी पार्वतीचे आई - वडील खूपच खुश झाले . आपल्या शास्त्रात यावेळी महादेवाला सुंदरमूर्ती या नावाने संबोधिलेले दिसते . 
       लग्नाच्या वेळी जेव्हा राजा हिमवानाने आपले कुल - घराणे याचा परिचय दिला  आणि महादेवाना आपल्या कुलाचारांबद्दल विचारले , तेव्हा महादेव शांतपणे बसून राहिले . त्याचीही शांतता पाहून राजा हिमवान अस्वस्थ झाले . देवर्षी नारदमुनींनी पुढाकार घेत महादेवाचे खरे रूप, त्यांची उत्पत्ती या बद्दल खुलासा केला . महादेवाची उत्पत्ती हि कोणत्याही कुळात झाली नसून ते स्वयंभू आहेत याची प्रचिती नारद मुनींनी दिली आणि अखेर शिव - पार्वतीचा विवाह संपन्न झाला .
तो दिवस म्हणजेच "महा - शिवरात्री ". 
      आपल्याकडे अनेक तरुण मुली  लग्न लवकर जमण्यासाठी , लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी शिव - रात्रीचे उपवास , पूजा करताना दिसतात . लग्नानंतरच्या अडचणींवर उपाय म्हणून सोमवारचे व्रत , श्रावण सोमवारचे उपवास आणि शिवाची आराधना सांगितली जाते मग ते ओमं चे chanting  असेल , किंवा “शिव - पार्वती शाबर  मंत्र “ पठण असेल.  अनेकांना या मंत्र पठणाचा खूप सकारात्मक उपयोग झालेला आहे . 
        जस  लग्न जमण्यासाठी  "रुक्मिणी स्वयंवर " ग्रंथाचे पारायण सांगितले जाते आणि त्यातून श्रीकृष्णाच्या अनेक गुणांचा उलघडा होतो जेणेकरून उपवर तरुनीना  श्री कृष्णाच्या योग्यतेचा नवरा  मिळावा म्हणून हि आराधना सांगितली जाते . आता शिवाची आराधना केल्यावर जर शिवाच्या योग्यतेचा नवरा मिळणारं असेल तर आजकालच्या किती मुलींना शिवा  सारखा वैरागी , अलिप्त  आणि ध्यानस्थ नवरा  चालेल ? जेव्हा काही उपवर तरुणींना थट्टेत हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तडक त्यांनी नाही मला असा नवरा अजिबात चालणार नाही अशी उत्तरे दिली . मग मी विचारलं शिवा सारखा नवरा जर नको असेल तर का करताय तुम्ही त्याची आराधना ? कशाला हा मंत्र जपताय ?? यावर त्यांच्या पैकी एकीकडेही उत्तर नव्हते . कोणत्या तरी गुरुजींनी सांगितले आणि आम्ही लग्न लवकर होऊ दे म्हणून हे करतोय.
                 अज्ञानात केलेल्या कोणत्याही कृतींना दिशा नसते. आणि हे कळायला काही अध्यात्मिक ज्ञान नव्हे तर थोडेसे व्यावहारिक ज्ञान गरजेचे असते . शिवाच्या हातात असणारे त्रिशूल हे  सत्व - रज आणि तम गुणाचे द्योतक आहे . जे गुण आपल्या सगळ्यांच्यातच आहेत . कदाचित कमी - जास्ती प्रमाणात . त्यानंतर येतो त्याच्या त्रिशुळाला अडकवलेला डमरू .  तुम्ही जर डमरूला exactly two  halfs मध्ये divide केला , मध्यभागी कापले तर आपल्याला दोन "ओम " दिसतील . म्हणजेच ३ गुण आणि "ओम" नी  परिपूर्ण हि शिवाची energy. आता हि शिवाची ध्यान मग्न , deep meditative  energy  कशाचे द्योतक आहे तर internalisation.  कारण जोपर्यंत आपण स्वतः च्या आत डोकावत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेरच्या जगातून नकारात्मक प्रतिसादच येणार आहेत . त्यामुळे नक्कीच महादेवाची आराधना लग्न लवकर जमण्यासाठी किंवा लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आहे पण त्याच बरोबर या महादेवाच्या energyशी connect  होऊन थोडसं internalisation केल्यास आपल्या स्वतःला आपण कदाचित जास्ती clarity नि बघू शकू आणि आपल्याला साजेशीर जोडीदार कसा हवा याचे प्रखरतेने चित्र आपण मांडू शकू. कारण आपल्या एकूणच personalityला , व्यक्तिमत्वाला साजेशीर स्थळ जर असेल , (मी भौतिक अपेक्षांबद्दल बोलत नाही ) तर लग्नांनंतर वैवाहिक जीवनात खूप काही अडथळे येण्याचे कारणच नाही . 
             त्यामुळे भोळ्या शिवाची आराधना करताना त्याच्या गुणाचाही आपण अवलंब केला तर लग्न नक्कीच लवकर ठरतील यात शंका नाही .

  24th June, 2021

Leave a Comment